Home > News Update > पुन्हा एल्गार परिषद होणार...

पुन्हा एल्गार परिषद होणार...

एल्गार परिषदेनंतर निर्माण झालेल्या मोठ्या वादानंतर आता एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. कोणी केलं आयोजन? कधी होणार परिषद? कोण असणार वक्ते? वाचा...

पुन्हा एल्गार परिषद होणार...
X

31 डिसेंबर 2017 ला झालेल्या एल्गार परिषदेनंतर आता पुन्हा एकदा 30 जानेवारी 2021 ला एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. रोहित वेमुला च्या जन्मदिनी ही परिषद घेण्यात येणार आहे.

'भीमा-कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानाचा' भाग म्हणून या एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे. या संदर्भात एल्गार परिषदेने एक परिपत्रक जारी केलं असून यंदाच्या एल्गार परिषदेचे प्रमुख वक्ते म्हणून माजी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन, राजा वेमूला आणि लेखक अरुंधती रॉय यांची निवड करण्यात आली आहे.

31 डिसेंबर 2017 ला पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा येथे दंगल उसळली होती. या दंगली मागे एल्गार परिषदेचा हात असल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. याच कार्यक्रमात नक्षलवादा संदर्भात साहित्य वाटल्याचा आरोपही पोलिसांनी ठेवला आहे. तसंच या प्रकरणात चळवळींशी संबंधिक असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये गौतम नवलाखा, सुधा भारद्वाज, वरावरा राव, अरूण फरेरा आणि व्हर्नोन गोन्सालविस यांचा समावेश आहे. या सर्व प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचला गेला. असा आरोपही या लोकांवर ठेवण्यात आला आहे.

तर दुसरीकडे याच प्रकरणात 'शिवप्रतिष्ठान'चे मनोहर भिडे तसंच 'समस्त हिंदु आघाडी'चे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 31 डिसेंबर 2019 ला कोरोनाचे आणि कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Updated : 19 Jan 2021 7:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top