Home > News Update > ठाण्यात लिफ्ट कोसळून भीषण दुर्घटना, 7 जणांचा मृत्यू

ठाण्यात लिफ्ट कोसळून भीषण दुर्घटना, 7 जणांचा मृत्यू

ठाण्यात लिफ्ट कोसळून भीषण दुर्घटना, 7 जणांचा मृत्यू
X

ठाण्यात अंडरग्राउंड लिफ्ट कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रुणवाल गार्डन इथं ही घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ठाणे पश्चिम इथं रुणवाल गार्डनमध्ये अंडरग्राउंड लिफ्ट कोसळल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत सात जण मृत्युमुखी पडले असल्याची माहिती समजते. लिफ्टमध्ये एकूण ८ जण होते, त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

ठाण्याच्या बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंग चे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना हा अपघात घडला.

Updated : 10 Sep 2023 3:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top