Home > News Update > नाशिक महापालिका निवडणुकीआधीच 14 बाजार समित्यांसाठी निवडणुका

नाशिक महापालिका निवडणुकीआधीच 14 बाजार समित्यांसाठी निवडणुका

नाशिक महापालिका निवडणुकीआधीच 14 बाजार समित्यांसाठी निवडणुका
X

नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीच्या आधीच नाशिक जिल्ह्यात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीआधीच 14 बाजार समित्यांसाठी निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. या बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.

नाशिक जिल्ह्यातील 23 ऑक्टोबरपर्यंत मुदत संपलेल्या 14 बाजार समित्यांची निवडणूक सहकार खात्याकडून जाहीर करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यातले राजकीय वातावरण तापले आहे. नाशिक बाजार समितीला यापूर्वी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदवाढही प्रत्येक सहा-सहा महिन्यांची होती. मात्र, जिल्ह्यात त्यानंतरही अनेक ठिकाणी कोरोना रुग्ण सापड होते.

त्यामुळे बाजार समितीच्या संचालकांना मुदतवाढ देण्याची मागणी केली. सहकार व पणन विभागाने एक परिपत्रक काढून ज्या कृषी उत्पन्न बाजार समितींची मुदत संपली होती, त्यांना 23 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे कळवले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट काहीशी कमी झाली आहे.तर तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या निवडणुका जाहीर करण्यात आल्यात. त्यात नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, नांदगाव, मनमाड, येवला, चांदवड, देवळा, घोटी, कळवण, दिंडोरी, सिन्नर, मालेगाव, सुरगाणा या बाजार समित्यांची निवडणूक होत आहे. त्यासाठी 10 नोव्हेंबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.

Updated : 11 Nov 2021 1:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top