Home > News Update > Election2025 : महालेंवर निवडणूक आयोग मेहरबान !

Election2025 : महालेंवर निवडणूक आयोग मेहरबान !

भाजपच्या प्रचाराला प्रशासन कामाला ?

Election2025 : महालेंवर निवडणूक आयोग मेहरबान !
X

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले प्रशासकीय अधिकारी असूनही राजकीय कार्यक्रमात सहभागी होऊन भाजपाचा प्रचार केल्याप्रकरणी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. यावर निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले, हे शासकीय सेवेत असताना उघडपणे आचारसंहितेच्या काळात भाजपचा प्रचार करत आहेत, ही अत्यंत गंभीर, गैरकायदेशीर व लोकशाहीविरोधी बाब आहे. यासंदर्भात बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी x एक्स व्हिडिओ शेअर केला आहे.

राहुल बोंद्रेंची नेमकी तक्रार काय ?

काही दिवसांपूर्वी चिखली येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात त्यांनी शासकीय कर्मचारी असूनही राजकीय स्टेजवर उपस्थिती लावली,

राजकीय कार्यक्रमाच्या पोस्टरवर त्यांचे फोटो झळकले, तसेच तेथून थेट भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

याहून महत्त्वाचे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना कोणताही राजकीय हस्तक्षेप करणे कायद्याने पूर्णपणे प्रतिबंधित आहे. शासकीय कर्मचारी हे जनतेची सेवा करण्यासाठी असतात, कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्यासाठी नाहीत. अशा प्रकारे पदाचा, शासकीय कार्यालयाचा व अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेचा वापर राजकीय फायद्यासाठी करणे हा निवडणूक आचारसंहितेचा स्पष्ट भंग आणि लोकशाही मूल्यांवरील आक्रमण आहे.

विशेषतः विद्याधर महाले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव या जबाबदारीच्या पदावर कार्यरत असल्याने, त्यांच्याकडून असा राजकीय हस्तक्षेप होणे अत्यंत अनुचित व चिंताजनक आहे.

असं त्यांनी म्हटलंय आहे.

Updated : 28 Nov 2025 1:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top