Home > News Update > मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी एकनाथ शिंदे यांची करोडोंच्या विकासकामांची घोषणा

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी एकनाथ शिंदे यांची करोडोंच्या विकासकामांची घोषणा

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी एकनाथ शिंदे यांची करोडोंच्या विकासकामांची घोषणा
X

शनिवारी ७४ वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने औरंगाबाद येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिवाय मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली गेली. यामनिमित्त केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील विकासकामांचा पाढाच वाचला.

आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांचं स्मरण मुख्यमंत्र्यांनी केलं. मराठवाड्यावर संतांचे संस्कार आहेत. मेहनती तरूण वर्ग आहे. वाढणारे उद्योग आहेत, पर्यटनाला भरपूर संधी आहे. पण तरीही विकासाची गती पकडायची आहे असं म्हणत त्यांनी मराठवाड्यातील सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांची यादीच वाचून दाखवली. शिवाय मुख्यमंत्री वॉर रूम मधून मराठवाड्यातील पायाभूत सुविधांचा नियमित आढावा घेण्याचं आश्वासन त्यांनी मराठवाडा वासियांना दिलं.

औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ येतील घृणेश्वर मंदीराच्या जीर्णोध्दारासाठी १५७ कोटींच्या निधीची घोषणा त्यांनी केली. औरंगाबाद ते अहमदनगर रेल्वे मार्गासाठी भुसंपादन, औरंगाबाद येथे क्रिडा विद्यापिठाची स्थापना, औरंगाबादच्या जुन्या पाणीपुरवठा योजनेचं पुनरूज्जीवन, समृध्दी महामार्गाने शिर्डीला जाण्यासाठी १७ किमीचा पोस्ट मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचं नुतनीकरण, मराठवाडा वॉटरग्रीडमध्ये नांदुर मधमेश्वर प्रकल्पातील ४ धरणांचा समावेश करून बंद पाईपलाईनने मराठवाड्याला पाणीपुरवठा करणे, मध्य गोदावरी उपखोऱ्यात ४४ प्रकल्पांना दिलेली शासनमान्यता, जायकवाडी धरणाच्या वितरकांची दुरूस्ती, पश्चिम वाहिनी नद्यांचं वाहुन जाणारं पाणी मराठवाड्य़ामध्ये वळवणं, जालना शहर पाणीपुरवठा योजना नुतनीकरण, हळद संशोधन केंद्रासाठी जागेची उपलब्धता, विमानतळाचं अतिरीक्त भुसंपादन, औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी जागेची उपलब्धता आणि अशा अनेक इतर कांमांची घोषणा त्यांनी केली. या शिवाय केंद्र सरकारकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्याच्या १२ हजार कोटींच्या निधी प्रस्तावास मंजुरी मिळवल्याचं त्यांनी सांगितलं.

याव्यतिरीक्त राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेतील रौप्य पदक विजेता अविनाश साबळे याला राज्य सरकारकडून घोषीत झालेल्या गौरव निधीचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.

Updated : 17 Sep 2022 2:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top