Home > News Update > जळगावात पुतळा अनावरणाचं राजकारण तापलं, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांऐवजी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार अनावरण

जळगावात पुतळा अनावरणाचं राजकारण तापलं, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांऐवजी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार अनावरण

जळगावात पुतळा अनावरणाचं राजकारण तापलं, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांऐवजी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार अनावरण
X

छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलं आहे. जळगावात महापालिकेत सत्ताधारी ठाकरे गट विरुद्ध राज्यातील सत्ताधारी भाजप-शिंदे गट असा सामना रंगलाय. शासकीय प्रोटोकॉल नुसार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री सर्व आमदार खासदारांना उपस्थितीत दोघंही पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम बाबत महापालिका प्रशासन राज्य सरकार कडे मार्गदर्शन मागितलं आहे. मात्र महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना ठाकरे गटाने उद्याच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुतळा अनावरण कोणत्याही परिस्थितीत करणार असल्याची भूमिका घेतली आहे यामुळे पुतळा आणावारणाचा वाद विकोपाला गेला आहे.

दोघात श्रेयवादाची लढाई

छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमारून ठाकरे गटविरुद्ध भाजप आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. हे दोन्ही पुतळे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आले आहेत. त्याला राज्य शासनाचा निधी देण्यात आलेला आहे. महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता आहे परंतु राज्यात भाजपा आणि शिंदे गट सत्तेत आहेत. त्यामुळे दोन्ही पुतळ्यांच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून श्रेय वादाची लढाई रंगली आहे. या दोन्ही पुतळ्यांच अनावरण हे राजशिष्टाचारानुसार व्हायला हवं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची तारीख वेळ निश्चित होईपर्यंत कार्यक्रम करू नये, असे आदेश शासनाने काढले आहेत. शासनाने हे आदेश काढल्यानंतर वाद वाढला. शासनाने घेतलेल्या भूमिकेला ठाकरे गटाने आक्षेप घेतलाय. ठाकरे गटाकडून या दोन्ही पुतळ्यांचा अनावरण करण्यासाठी उद्धव ठाकरेंना आमंत्रित करण्यात आले असून ते उद्या जळगावात येणार आहेत. मात्र या कार्यक्रमाच्या पूर्वीच हा वाद वाढला आहे. दरम्यान काहीही झालं तरी उद्याच दोन्ही पुतळ्यांच अनावर उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार असून उद्धव ठाकरेंची सभा ही होणार आहे याची सर्व तयारी झाली आहे.

उद्धव ठाकरेंचाचं हट्ट का?

भाजप आणि शिंदे गटाने देखील भूमिका स्पष्ट केली आहे. या विषयात कोणत्याही स्वरूपाचा राजकारण नाही. परंतु शासनाच्या आदेशानुसार दोन्ही पुतळ्यांचं अनावरण हे राजशिष्टाचारानुसारच व्हायला हवं. जिल्ह्यात तीन मंत्री आहेत यात पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हेही आहेत असं असतांना उद्धव ठाकरेंच्या हस्तेचं असा हट्ट का ? असा सवाल राज्यातील सत्ताधारी भाजप शिवसेना (शिंदे गटाने ) केला आहे.

महापालिकेची मुदत पुढील महिल्यात संपत आहे

विशेष म्हणजे महापालिका सदस्यांची मुदत पुढच्या महिन्यात संपत आहे आहे. यामुळे नगसेवकांचे अधिकार संपणार आहेत. आणि महापालिकेवर प्रसासक असणार आहेत. नगरसेवकांची मुदत संपणार असल्याने पुतळा अणावारणाचा कार्यक्रम घाईत केला जात असल्याचा आरोप ही सत्ताधारी तसंच विरोधकांवर सर्वसामान्य नागरिक करत आहे. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे महापुरुषांच्या पुतळा ही राजकारनाच केंद्र बनत आहे हेच दुर्दैव.

Updated : 9 Sep 2023 11:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top