News Update
Home > News Update > धोकादायक इमारतीतील रहिवाशांची महापालिकांनी जेवणखाण्याची आणि निवाऱ्याची व्यवस्था करावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

धोकादायक इमारतीतील रहिवाशांची महापालिकांनी जेवणखाण्याची आणि निवाऱ्याची व्यवस्था करावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच बैठकांचा धडाका लावला आहे. तर पावसाळ्यात धोकादायक इमारतीत राहणाऱ्या लोकांची सोय करण्याबाबत एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे. चे आपत्तीव्यवस्थापनाचा आढावा घेणाऱ्या बैठकीत बोलत होते.

धोकादायक इमारतीतील रहिवाशांची महापालिकांनी जेवणखाण्याची आणि निवाऱ्याची व्यवस्था करावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
X

एकनाथ शिंदे म्हणाले की, सर्व यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय ठेऊन कोणत्याही परिस्थितीत आपत्तींमध्ये जीवितहानी होणार नाही हे बघावे. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करावे म्हणजे यंत्रणेतील सर्व लोक देखील सतर्क राहतील.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, आपत्तीमध्ये समन्वय अतिशय महत्त्वाचा आहे. एनडीआरएफने त्याचप्रमाणे लष्कराने देखील गेल्यावर्षी पुराच्या परिस्थितीत चांगले काम केले आहे. कोणत्याही परिस्थितीत संपर्क आणि संवादाचा अभाव राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असंही शिंदे म्हणाले.

जिल्हाधिकारी व पालिका कार्यालयांमधील वॉर रुम यंत्रणा सज्ज राहून लोकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा. तसेच गेल्या वर्षी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. विशेषत: नेहमी दरड कोसळणाऱ्या जागांव्यतिरिक्त नव्या ठिकाणी या दरडी कोसळल्या. त्यामुळे यंदा देखील अधिक दक्ष राहण्याची गरज आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना मोठ्या पावसाच्या वेळेस तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये हलवून त्या ठिकाणी त्यांना जेवण्याखाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी पालिकांनी घ्यावी. याबरोबरच मी आणि उपमुख्यमंत्री 24 तास आपणा सर्वांसाठी उपलब्ध असून आपल्याला गतीमानतेने शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविल्या पाहिजेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मात्र नव्या सरकारचे मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई महापालिकेच्या कामाचे कौतूक केले. यावेळी ते म्हणाले की, 275 मि.मी. पाऊस एका दिवसात पडूनही महानगरपालिकेने तसेच रेल्वेने सफाई तसेच पाणी तुंबणार नाही यासाठी केलेल्या व्यवस्थेमुळे कोठेही मुंबईकरांना त्रास झाला नाही व वाहतुकही व्यवस्थित सुरळीत राहिली आहे.

Updated : 2 July 2022 2:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top