Top
Home > News Update > एकनाथ खडसेंच्या सुनेचे राज्य सरकारविरुद्ध आंदोलन

एकनाथ खडसेंच्या सुनेचे राज्य सरकारविरुद्ध आंदोलन

एकनाथ खडसेंच्या सुनेचे राज्य सरकारविरुद्ध आंदोलन
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या सून आणि भाजपच्य़ा खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारविरोधात आंदोलन केले. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. "मुख्यमंत्र्यांना फोन केला, पण ते फोन घेत नाहीत. तर कृषीमंत्री म्हणतात सचिवांशी बोला, शेतकरी कोणत्या पक्षाचा नाही तो अन्नदाता आहे, यावर राजकारण करू नका" या शब्दात रक्षा खडसे यांनी सरकारवर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे तर त्यांची सून रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. या आंदोलनात गिरीश महाजनदेखील सहभागी झाले होते.

Updated : 2020-11-09T16:33:01+05:30
Next Story
Share it
Top