Home > News Update > एकनाथ खडसे आज विधिमंडळात येणार?

एकनाथ खडसे आज विधिमंडळात येणार?

एकनाथ खडसे आज विधिमंडळात येणार?

एकनाथ खडसे आज विधिमंडळात येणार?
X

एकनाथ खडसे आहेत कुठे? ED ची नोटीस आल्यापासून माध्यमांपासून दूर असलेले खडसे कुठं आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना रंगत असताना खडसे आज विधान भवनात येणार असल्याचं बोललं जात आहे.

विधान परिषदेची उमेदवारी जोपर्यंत नक्की होत नाही. तोपर्यंत एकनाथ खडसे यांनी आपले पत्ते राखून ठेवायचा डाव खेळला आहे. पुण्यातील भोसरी भूखंड प्रकरणात त्यांची चौकशी सुरू असून तोपर्यंत एखादं वैधानिक पद त्यांच्याकडे असेल तर त्यांना भाजपवर सतत वार करणं सोपं जाईल. असं बोलंल जात आहे. त्यामुळं खडसे आज विधानभवनात येत असताना खडसे नक्की कोणाच्या भेटी घाटी घेतात? भाजपच्या विरोधात खडसे नक्की कोणता प्लान पक्ष नेतृत्वाला देतात का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी माझ्यामागे इडी लावली तर आपण सीडी लावू अशी घोषणा खडसे यांनी केली होती. आता खडसे मागे इडी लावली आहे. त्यामुळं खडसे सीडी कधी लावणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Updated : 9 March 2021 4:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top