Top
Home > News Update > राज्य सरकारच्या एका निर्णयावर खडसे नाराज

राज्य सरकारच्या एका निर्णयावर खडसे नाराज

राज्य सरकारच्या एका निर्णयावर खडसे नाराज
X

जळगाव - पंढरपूरच्या वारीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्बंधांवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुक्ताईनगर येथील मुक्ताबाईची पालखी गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूरला जात असते हा पालखी सोहळा गेल्या अनेक वर्षापासून साजरा होत आहे. या पायी वारीमध्ये अनेक लोक सामील होत असतात. पण कोरोनामुळे दोन ववर्षांपासून पायी वारीला बंदी आहे.

" राज्य सरकारने या पालखी सोहळ्यासाठी शंभर जणांना एसटीमधून जाण्यासाठी परवानगी दिली आहे‌. पांडुरंगाच्या दर्शनासाठी जगभरातला वारकरी आसुसलेला असतो आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन व्हावं ही वारकऱ्यांची इच्छा असते. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून राज्य सरकारला प्रस्ताव अनेक पाठवलेले होते, या प्रस्तावांचा विचार झाला असता तर अनेक वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन घेता आले असते अशी खंत एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली आहे.


Updated : 12 Jun 2021 10:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top