Home > News Update > एकनाथ खडसेंना कोरोना, ED कडून 14 दिवसांनी चौकशी

एकनाथ खडसेंना कोरोना, ED कडून 14 दिवसांनी चौकशी

एकनाथ खडसेंना कोरोना, ED कडून 14 दिवसांनी चौकशी
X

भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आली आहे. ईडीच्या चौकशीआधी एकनाथ खडसेंचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळं खडसेंच्या चिंतेत भर पडली आले. पुणे येथील भोसरी MIDC च्या भूखंड खरेदी प्रकरणी ED ने खडसेंना नोटीस बजावून 30 तारखेला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र खडसेंना कोरोनाची लक्षण जाणवत असल्याने त्यांनी कोरोना टेस्ट केली. त्यात कोरोना असल्याचं निष्पन्न झाले तसा अहवाल जिल्हा रुग्णालयाला मिळाला आहे.

खडसेंची प्रतिक्रिया

"पुणे MIDC जमीन खरेदी प्रकरणी नोटीस मिळाली आहे. प्रकरणी चारवेळा चौकशी झाली आहे. ED ला आपण सहकार्य करणार आहोत. 14 दिवसांनंतर चौकशीला येऊ, वेळ मिळावी अशी विनंती केली, ED ने ती मान्य केली असून 14 दिवसानंतर ED ला सहकार्य करू" असे खडसेंनी म्हटलं आहे.

Updated : 31 Dec 2020 7:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top