Top
Home > News Update > खडसे-महाजन आमने सामने, आज जळगावात होणार बैठक

खडसे-महाजन आमने सामने, आज जळगावात होणार बैठक

खडसे-महाजन आमने सामने, आज जळगावात होणार बैठक
X

विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच भाजपकडून पराभूत जागांवरील कारणांचा शोध घेतला जाणार आहे. भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवाला पक्षातीलच नेते कारणीभूत असल्याचा थेट आरोप केल्यानंतर ही बैठक होत आहे.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटन प्रमुख विजय पुराणिक,गिरीश महाजन, एकनाथ खडसे, तसंच उत्तर महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदार, संघटनेतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

भाजपनं राज्यात सत्ता गमावल्यानंतर पक्षामध्येच अंतर्गत कलह उफाळून आलाय, पंकजा मुंडेंच ट्विटर वरून भाजप हटवणं, नाराज खडसेंनी पक्ष नेतृत्वालाच पराभवाला जबाबदार ठरवल्याने वाद निर्माण झालाय, तर दुसरी कडे पक्षांतर्गत पाडापाडी करणाऱ्यांच नावं जाहीर करा असं खुलं आव्हान गिरीश महाजन यांनी खडसेंना दिल्याने ही बैठक वादळी होणार आहे.

Updated : 7 Dec 2019 5:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top