Home > News Update > राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे अपघातातून बचावले

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे अपघातातून बचावले

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे अपघातातून बचावले
X

भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली. अमळनेरवरून जळगावकडे येत असताना धरणगाव जवळ गाडीचं टायर फुटल्यानं हा अपघात झाला. सुदैवानं यात एकनाथ खडसे यांच्यासह सर्वजण सुखरूप आहेत. त्याचबरोबर कुणालाही दुखापत झालेली नाही.

अपघात झाल्याची माहिती स्वतः एकनाथ खडसे यांनी ट्विट करून दिली.

खडसे हे आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बरोबर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा हुन हेलिकॉप्टर ने अमळनेर येथ पोहचले होते , अमळनेर येथ राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांच्या घरी झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख हे एका शासकीय कार्यक्रमासाठी निघाले तर खडसे हे जळगाव ला आपल्या वाहनाने निघाले असतांना धरणगाव जवळ हा अपघात झाला, सुदैवाने सर्व सुखरूप आहेत

Updated : 1 Nov 2020 2:36 PM GMT
Next Story
Share it
Top