Home > News Update > ED प्रकरणात अनिल देशमुखांना जामीन, पण सुटका नाही...

ED प्रकरणात अनिल देशमुखांना जामीन, पण सुटका नाही...

ED प्रकरणात अनिल देशमुख यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनिल देशमुख यांची सुटका होणार नाही. वाचा नेमकं काय आहे कारण?

ED प्रकरणात अनिल देशमुखांना जामीन, पण सुटका नाही...
X

ईडी (ED) बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ११ महीन्यापासून जेलमधे असलेल्या अनिल देशमुखांना उच्च न्यायालयाने जामीन दिला असून अद्यापही त्यांच्यावर सीबीआयचा प्रलंबित खटला सुरु असल्यामुळे लगेचच त्यांची सुटका होणार नाही. आता सीबीआय प्रकरणात न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

100 कोटींच्या कथीत घोटाळाप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अकरा महिन्यांपासून तुरूंगात आहेत. त्यांच्या जामीनावर आज उच्च न्यायालयाला निर्णय दिला आहे. ज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख नोव्हेंबर 2021 पासून अटकेत आहेत. त्यांच्याविरोधात कथीत 100 कोटी रुपयांची वसूली आणि खंडणीचे ED आणि CBI ने आरोप होतेय

अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे की, माझ्याविरोधात खंडणी आणि वसूलीचे करण्यात आलेले आरोप हे राजकीय हेतूने केले आहेत. तपास यंत्रणांकडे माझ्याविरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही. याबरोबरच वाढणारे वय आणि आजार यांमुळे जामीन मिळावा, अशी विनंती अनिल देशमुख यांच्यावतीने उच्च न्यायालयात केली होती. सोमवारी उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एन. जे जमादार यांनी सविस्तर सुनावणी घेऊन निर्णय प्रलंबित ठेवला होता. ED कडून अनिल सिंह यांनी जामीन आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली होती.

2021 मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली चारचाकी गाडी आढळून आली. त्यावरून तात्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून अधिवेशनात राज्य सरकारची चांगलीच कोंडी केली. यानंतर या प्रकरणात सचिन वाझे यांच्यावर आरोप करण्यात आले व पुढे सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. सचिन वाझे याच्या अटकेनंतर या प्रकरणी तात्कालिन पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांची बदली करण्यात आली. मात्र परमबिर सिंह यांनी थेट तात्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसूलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या अटकेसाठी रान उठवले. त्यामुळे अखेर अनिल देशमुख यांना 5 एप्रिल 2021 रोजी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

अनिल देशमुख यांचा राजीनामा ते जेल

यानंतर अनिल देशमुख यांची ED कडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर अनिल देशमुख अनेक दिवस अज्ञातवासात होते. या कालावधीत त्यांनी अटकपुर्व जामीनासाठी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र दोन्ही ठिकाणी अनिल देशमुख यांना दिलासा देण्यात आला नाही. त्यानंतर अखेर 2 नोव्हेंबर 2021 रोजी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. तेव्हापासून अनिल देशमुख हे अटकेत आहेत.

यापुर्वीही दाखल केला होता जामीन अर्ज

अनिल देशमुख यांना अटक करण्यात आल्यानंतर 18 मार्च 2022 रोजी त्यांनी पीएमएलए कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र यावेळीही त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. या अर्जात प्रकृती अस्वस्थता आणि वाढत्या वयाचे कारण देण्यात आले होते. देशमुख हे 73 वर्षाचे आहेत. तसेच त्यांचा खांदा निखळला आहे. याबरोबरच अनिल देशमुख यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र ती मागणी न्यायालयाने फेटाळली. अनिल देशमुख यांना कोरोना झाला होता. त्यामुळे त्यांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम झाला आहे. तसेच त्यांना विविध आजारांनी ग्रासले आहे. तसेच आधारासाठी त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून रहावं लागतं. त्यामुळे मानवतेच्या भावनेने अनिल देशमुख यांची जामीनावर सुटका करण्यात यावी, अशी मागणी जामीन अर्जात करण्यात आली होती. जामीन मंजूर करताना हायकोर्टानं १ लाखाच हमीपत्र मागितलं आहे. सीबीआयने दाखल केलेल्या स्वतंत्र गुन्हातही अनिल देशमुखांवर आरोप आहे. त्यामुळे तुर्तास तरी अनिल देशमुखाची सुटका होणार नाही.

Updated : 4 Oct 2022 9:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top