Home > News Update > राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाकडून विशेष पीएमएलए कोर्टामध्ये बुधवारी ७ हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यात अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश आणि सलील यांच्याही नावाचा समावेश असल्याची माहिती आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल
X

मुंबई // राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाकडून विशेष पीएमएलए कोर्टामध्ये बुधवारी ७ हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यात अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश आणि सलील यांच्याही नावाचा समावेश असल्याची माहिती आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर केलेल्या १०० कोटी वसुली आरोपांवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने प्राथमिक तपास करून गुन्हा नोंदवला.आणि पुढील तपास सुरू केला आहे. याच गुन्ह्याच्या आधारे ईडीने देशमुख यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता.

याआधी अनिल देशमुख यांच्या विरोधात ऑगस्ट महिन्यात ईडीने पहिले आरोपपत्र दाखल केले होते. यात देशमुख यांच्या नागपूरमधील संस्था, श्री साई शिक्षण संस्था तसेच खासगी सचिव संजीव पालांडे, स्वीय सहाय्यक कुंदन शिंद यांच्यासह अन्य काही जणांचा समावेश होता. २ नोव्हेबरला अनिल देशमुखांंना अटक करण्यात आली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

दरम्यान ईडीने बुधवारी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये अनिल देशमुख यांच्या जबाबासह माजी सचिव सीताराम कुंटे, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अन्य जबाबाचा समावेश आहे. तसेच, देशमुख यांच्या काळात पोस्टिंग झालेल्या १२ पोलीस उपायुक्तांंचाही या आरोपपत्रात जबाब आहे.

Updated : 30 Dec 2021 2:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top