Home > News Update > नांदेड मध्ये भूकंपाचे धक्के

नांदेड मध्ये भूकंपाचे धक्के

नांदेड मध्ये भूकंपाचे धक्के
X

नांदेड शहराला रविवारी सकाळी साडे आठ वाजता भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले, शहर व परिसरातील नागरिकांनी या धक्क्याचा अनुभव सकाळी घेतला.

शहरातील छत्रपती चौक, फरांदे नगर, एकता नगर, तुळजाभवानी नगर, मालेगाव रोड, नालंदा नगर, स्नेहनगर, पोलीस कॉलनी, हनुमानपेठ ,वजीराबाद, सिडको , पूर्णा रोड नवीन पूल, तरोडा, सांगवी परिसरातही सौम्य धक्के जाणवले. तसेच अर्धापूर येथील काही घरांची पत्रे हलल्याचे नागरिकांनी सांगितले.

यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे National Centre for Seismology च्या संकेतस्थळावरून निदर्शनास येत आहे. याची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल एवढी होती. यासोबतच शेजारील हिंगोली जिल्ह्यात भूकंपाची तीव्रता अधिक होती. जिल्ह्यातील वसमत शहरासह तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव येथे भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांना जाणवले.

नांदेड शहरापासून जवळच असलेल्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, कवठा, कुरुंदा, बोराळा, खुदनापूर, किनोळा, बोरगाव या परिसरातही भूकंपाचा धक्का जाणवला. जमिनीतून नागरिकांनी गुढ आवाज ऐकला..

गावातील नागरिकांमध्ये ऐन सकाळी भीतीचे वातावरण पसरले आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना नागरिकांनी घाबरुन न जाण्याचं आवाहन केलं आहे. मी आपल्या शेजारील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी, मुख्यालय यांच्याशी संपर्कात असून जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी आम्ही घेत आहोत. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी सांगितले.

Updated : 11 July 2021 6:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top