Home > News Update > Earthquake : जळगाव जिल्ह्यात भूकंप

Earthquake : जळगाव जिल्ह्यात भूकंप

गेल्या काही दिवसांपुर्वी पालघर (Palghar) जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले होते. त्यापाठोपाठ आता जळगाव जिल्ह्यात सकाळी 10 वाजून 35 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Earthquake : जळगाव जिल्ह्यात भूकंप
X

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भुसावळ (Bhusawal) शहर आणि परिसरात सकाळी १०.३५ मिनिटांनी भूकंपाचे झटके बसले. या घटनेमुळे नागरीकांमध्ये खळबळ उडाली आहे. भुसावळसह लगतच्या कंडारी रायपुर भागातही दहा ते वीस सेकंद हे धक्के जाणवले. या भूकंपात (Earthquake) कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात शुक्रवारी सकाळीच भूकंपाचे झटके बसले आहेत. भुसावळ, सावदा परिसरात सकाळी १०.३५ मिनिटांच्या सुमारास ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे झटके जाणवले आहेत. उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी ही माहिती दिली आहे. भूकंपाचे धक्के बसल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिक शहरापासून २७८ किलोमीटर अंतरावर म्हणजेच भुसावळ, सावदा परिसरात नोंदवण्यात आल्याची माहिती , निवासी उपजिल्हाधिकारी राहूल राहुल पाटील (Rahul Patil) यांनी दिली. दरम्यान, भूकंपामुळे कुठेही नुकसान किंवा हानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही. तसेच हतनूर धरणाला (Hatnoor Dam) या धक्क्यांमुळे काहीही धोका नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Updated : 27 Jan 2023 9:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top