Home > News Update > देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी, पोलीस भरतीसाठी तरुण आक्रमक

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी, पोलीस भरतीसाठी तरुण आक्रमक

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी, पोलीस भरतीसाठी तरुण आक्रमक
X

नांदेड : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमादरम्यान पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांनी घोषणाबाजी केली. नांदेड येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने आयोजित ध्वजारोहणासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड येथे आले होते. यावेळी श्रीनगर भागात चित्रप्रदर्शन कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात फडणवीस यांच्या भाषणादरम्यान पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांनी पोलीस भरती झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला.

Updated : 17 Sep 2022 7:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top