“जग बदलणारा बापमाणूस” पुस्तकाच्या डुप्लिकेट प्रती, गुन्हा दाखल
Duplicate copies of the book “Jag Bandharana Baapmanus”, case registered
X
नवी मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाच्या डुप्लिकेट प्रति बाजारात खुलेआम विकल्या जात आहेत. त्याविरोधात पुस्तकाचे लेखक, व्याख्याते जगदीश ओहोळ यांच्या तक्रारीवरुन नवी मुंबई पोलिसांनी विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. आर्थिक, मानसिक नुकसानीपेक्षा डुप्लिकेट पुस्तकातून चुकीचा मजकूर वाचकांपुढे जाऊ नये, यासाठी विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याचं ओहोळ यांनी सांगितलंय.
२८ नोव्हेंबर २०२५ रोजी जगदीश ओहोळ यांचं नवी मुंबईतल्या ऐरोली इथं व्याख्यान होतं. व्याख्यानानंतर ओहोळे हे नवी मुंबईतल्याच खांदा कॉलनी इथं त्यांच्या नातेवाईकांकडे मुक्कामासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे मामा महादेव वाघमारे यांनी ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे विकत घेतलेलं पुस्तक ओहोळ यांना दाखवलं. पुस्तक पाहिल्यानंतर ते डुप्लिकेट असल्याचं ओहोळ यांच्या लक्षात आलं. त्यांनी अधिक चौकशी केल्यानंतर कळालं की, ते पुस्तक पनवेल इथं सुरु असलेल्या संविधान महोत्सवातून मनमोहन मिश्रा या स्टॉलवरुन विकत घेण्यात आलं. वाघमारे यांनी याच पुस्तकाच्या १२५ प्रती ऑर्डरही केल्या आहेत. त्यासाठी ४२०० रुपये एडवांस म्हणून मिश्रा यांना दिलेही.
यासंदर्भात जगदीश ओहोळ म्हणाले की, घडलेल्या प्रकारामध्ये आर्थिक, मानसिक नुकसान होण्यापलिकडे साहित्यामध्ये भेसळ करुन चुकीचा संदेश, मजकूर वाचकांपर्यंत जाऊ नये, हा धोका ओळखून वेळीच संबंधितांविरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.






