Home > News Update > अवकाळी पावसामुळे ऊस तोड मजूरांसह जनावरांचे प्रचंड हाल

अवकाळी पावसामुळे ऊस तोड मजूरांसह जनावरांचे प्रचंड हाल

अवकाळी पावसामुळे ऊस तोड मजूरांसह जनावरांचे प्रचंड हाल
X

अहमदनगर : महाराष्ट्रात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अहमदनगर जिल्ह्यात आलेल्या ऊसतोड मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत.एकीकडे गळीत हंगाम सुरु आहे,तर दुसरीकडे बदलत्या ‌हवामानामुळे कधी पाऊस, कधी थंडी तर कधी ऊन अशा परिस्थितीत ऊसतोड मजुरांना काम करावे लागत आहे. अहमदनगर जिल्ह्यात सलग दोन दिवस होत असलेल्या पावसामुळे ऊसतोड मजूरांच्या कोप्यांमध्ये पाणी शिरल्याने त्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

तसेच सोबत आणलेल्या जनावरांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

जिथे माणसाच्या निवाऱ्याचा प्रश्न असताना जनावरांचे काय होणार? कालच अवकाळी पावसामुळे पारनेर आणि जुन्नरमध्ये शेकडो मेंढ्या मृत पावल्या असताना ऊसतोड मजुरांना या अवकाळी पावसाचा फटका बसत आहेत. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसमुळे वातावरणात गारवा वाढला आहे.त्यामुळे ऊसतोड मजुरांसह जनावरांचे हाल होत आहेत.

पावसामुळे सर्वच रस्ते चिखलमय झाल्याने उसवाहतुकीसाठी अडचणी येत असल्याचे ऊसतोड मजुरांचे म्हणणे आहे. जिथे माणसांना पायी चालणं अवघड झालं असताना एवढा बोजा घेऊन बैलांना कसं चालता येणार? असं ऊसतोड मजुरांचे म्हणणे आहे. त्यातच ज्याठिकाणी ऊसतोड मजुरांची निवाऱ्यासाठी कोप्या घातल्या आहेत, तिथे पाणी साचल्याने मुलाबाळांची दैना झाल्याचे ऊसतोड मजूर सांगतात. त्यामुळे कारखान्यांनी चांगल्या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Updated : 4 Dec 2021 1:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top