Home > News Update > तलाठ्यांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन, दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची फरफट

तलाठ्यांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन, दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची फरफट

तलाठ्यांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन, दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची फरफट
X

सध्या राज्यभरातील तलाठ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे हैराण झालेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेले दोन वर्षे शाळा कॉलेज कोरोनाच्या महामारीमुळे बंद होते. शाळा कॉलेजे सुरू करण्यासाठी राज्यसरकारने काही निर्बंध घालून शाळा व कॉलेजे सुरू केली. मात्र कॉलेज सुरू केल्यानंतर प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी अत्यंत आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. त्याशिवाय प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत नाही. यामुळे गेल्या चार पाच दिवसांपासून तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या विद्यार्थ्यांचे आता चांगलेच हाल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी देखील आता आंदोलनाचा पवित्र्यात आहेत.



या आंदोलनासंदर्भात तलाठी संघटनेचे राज्याध्यक्ष व राज्याचे सचिव व राज्याचे उपाध्यक्ष महामुनी यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. नाही. दोन दिवसांच्या आत जर तलाठी कामावर हजर झाले नाही तर, त्यांना शिवसेना स्टाईलने कामावर हजर करून घेऊ असा इशारा शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप माने यांनी दिला आहे.

Updated : 25 Oct 2021 2:10 PM GMT
Next Story
Share it
Top