Home > News Update > Tiktok आणि Reelsच्या लाईक्समुळे स्टार झालेले अभिनयात कमी पडतात – मकरंद अनासपुरे

Tiktok आणि Reelsच्या लाईक्समुळे स्टार झालेले अभिनयात कमी पडतात – मकरंद अनासपुरे

Tiktok आणि Reelsच्या लाईक्समुळे स्टार झालेले अभिनयात कमी पडतात – मकरंद अनासपुरे
X

आज अनेक तरुण तरुणी Tiktok आणि रिल्सवर मिळणाऱ्या लाखो लाईक्समुळे अनेक तरुण-तरुणी जगप्रसिद्ध झाल्याच्या अविर्भावात वावरतात, मात्र जेव्हा ते प्रत्यक्ष अभिनय करायला उतरतात तेंव्हा खरा कस लागतो आणि त्यांना निराशा येते, असे मत व्यक्त केले आहे प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी. मॅक्स महाराष्ट्रचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांच्याशी बातचीत करताना मकरंद अनासपुरे यांनी विविध विषयांवर आपली मतं व्यक्त केली. कलाकाराने जात पाळू नये, तो स्वतःच भटक्या जमातीचा असतो, असे मतही त्यांनी अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केल्याने निर्माण झालेल्या वादावर केले आहे.

त्याचवेळी मराठी सिनेमा बदलतो आहे आणि नवे प्रयोग करणारे दिग्दर्शक येत आहेत, मात्र सरकारने गावोगावी चित्रपट प्रदर्शन करण्याची व्यवस्था केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच दक्षिणेत जसे त्यांच्या भाषेतील चित्रपट मुख्य चित्रपटगृहात आणि प्राईम टाईम शोला प्रदर्शित होतात, तसेच महाराष्ट्रातही केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही "भारतीय" नावाचा सुंदर सिनेमा बनवला, पण दुसऱ्या आठवड्यात "एक था टायगर" प्रदर्शित झाला आणि अर्धे चित्रपटगृह रिकामे झाले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Updated : 8 Feb 2022 1:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top