Home > News Update > नियमांना डावलून रेलकॉन कंपनीचा नागरिकांच्या जीवाशी खेळ!

नियमांना डावलून रेलकॉन कंपनीचा नागरिकांच्या जीवाशी खेळ!

नियमांना डावलून रेलकॉन कंपनीचा नागरिकांच्या जीवाशी खेळ!
X

देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. देशाच्या आर्थिक गतीला चालना मिळावी म्हणून काही कंपन्यांचा सहभाग महत्वाचा समजला जातो. मात्र, मुंबईमध्ये अशा काही कंपन्या आहेत ज्या नियमांना डावलून नागरिकांसाठी समस्या बनल्या आहेत.

मुंबईतील चांदवलीमधील विजय लक्ष्मी रोडवर रेलकाँन नावाची कंपनी आहे. सिमेंट मिक्सर प्लँट असलेली ही कंपनी २००१ च्या सुमारस स्थापन झाली. ही कंपनी दुसरीकडे स्थलांतरित व्हावी म्हणून स्थानिक लोकांनी अनेकवेळा आंदोलनं केले आहेत. पण या आदोलनाचा काहीच फायदा झालेला नाही.

मुळातच ह्या कंपनीमुळे अनेकांचे अपघात झालेले आहेत, शासन आणि हवामान खात्याच्या नियमाप्रमाणे नागरिक वसाहतीपासून सिमेंट कंपनी दूर असावी असा नियम आहे. त्यातही मुख्य रस्त्यापासून कंपनी १०० मीटर आतील बाजूस असावी. कंपनीच्या बाजूला ५ मीटरवर ग्रीन बेल्ट आणि कंपनीच्या आत स्वतंत्र पार्किंग व्यवस्था असली पाहिजे. त्याचबरोबर मोठ्या वाहनांसाठी टायर वॉशरची सुविधा असली पाहिजे असे नियम आहेत. या कंपनीमधून दर वर्षाला किती प्रदूषण होत आहे याची तपासणी हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी करणे बंधनकारक आहे.

परंतू या नियमांपैकी कोणताही नियम कंपनी पाळत नाही. या कंपनीमधील सिमेंटची वाहनं रस्त्यावर उभी केली जातात. या कंपनीत टायर वॉशर नसल्यामुळे या वाहनांच्या टायरला लागलेले सिमेंट हे रस्त्यावर पसरते. त्यामुळे दुचाकी-चारचाकी वाहनं स्लिप होऊन वारंवार अपघाता होत आहेत.

अशा अपघातात अनेकांना बळी गेला आहे. कित्येकजण जखमी झाले आहेत. धुळीचे कण नागरिकांच्या ङोळ्यात जाऊन अनेकांना डोळ्यांचे आजार झाले आहेत. सिमेंट मिक्सर प्लँटच्या धुळीच्या कणांमुळे स्थानिक नागरिकांना दमा, अस्थमा, कँन्सरसारख्या आजारांनी ग्रासलंय. तरीदेखील प्रदुषण खात्याच्या अहवालात नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत काहीच उल्लेख केला जात नाहीय.

बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या कंपनीवर कोणतेही कारवाई आरटीओकडून केली जात नाही. त्यामुळे या अपघातला आरटीओ पोलिस प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत.

या संदर्भात आम्ही कंपनीचे व्यवस्थापक, अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. या कंपनीमुळे जर येथील स्थानिक नागरिकांना काही अडचण किंवा समस्या असेल तर त्यांच्याशी चर्चा करुन यातून मार्ग काढू अशी प्रतिक्रीया रेलकॉन कंपनीचे मार्केटींग मॅनेजर केयूर गांधी यांनी ‘मॅक्स महाराष्ट्र’शी बोलताना दिली. मात्र महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलण्यास त्यांनी नकार दिला.

त्यानंतर आम्ही स्थानिक नगरसेविका आकांक्षा शेट्ये यांनादेखील विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीही यासंदर्भात बोलण्यास नकार दिला.

Updated : 7 March 2020 7:18 AM GMT
Next Story
Share it
Top