Home > मॅक्स रिपोर्ट > मुंबईत कोरोनावरील लसीकरणाची ड्रायरन

मुंबईत कोरोनावरील लसीकरणाची ड्रायरन

कोरोनाच्या लसीकरणासाठी मुंबईतही ड्रायरन सुरू झाल्या आहेत. लसीकरण नेमके कसे होईल, त्यानंतर काय खबरदारी घेतली जाणार आहे, याची माहिती देणारा रिपोर्ट पाहा....

मुंबईत कोरोनावरील लसीकरणाची ड्रायरन
X

कोरोनावरील लस तयार झाली असून लवकरच लसीकरणाचा सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत बीकेसी इथल्या लसीकरण केंद्रात ड्रायरन घेण्यात आली. कोव्हीड एपमध्ये नोंदणी केलेल्या 25 लाभार्थी या लसीकरणच्या ड्रायरनमध्ये सहभागी होणार आहेत. या बिकेसी लसीकरण केंद्रात प्रत्यक्ष लसीकरण सुरू झाल्यानंतर एकावेळी 15 व्हॅक्सीनेशन रूममध्ये 15 लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे.

या ठिकाणी दिवसाला अडीच हजारांच्या जवळपास लाभार्थ्यांना लस देण्याचं लक्ष्य देण्यात येणार आहे. त्यासाठी मोठी वेटिंग रूम, 7 रजिस्ट्रेशन काउंटर, 15 व्हक्सीनेशन सेंटर, ऑब्झर्वेहेशन सेंटर, मॉनिटरिंग रूम (ज्या ठिकाणी लस दिल्यानंतर त्रास झाल्यास उपचार केला जाणार). अशाप्रकारे तयारी करण्यात आली आहे. व्यक्तीला लसीकरणानंतर त्रास झाल्यास तातडीने मॉनिटरिंग रूममध्ये उपचार केले जाणार आहेत. सोबतच या ठिकाणी आयसीयूचीही सोय सुद्धा असणार आहे. एकूण 90 डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी या ठिकणी या लसीकरणच्या मोहिमेत काम करणार आहेत.

Updated : 8 Jan 2021 9:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top