Home > News Update > भीमांजली: 6 डिसेंबरला महामानवाला संगीतातून आंदराजली !भीमांजली !

भीमांजली: 6 डिसेंबरला महामानवाला संगीतातून आंदराजली !भीमांजली !

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिनानिमित्त जगप्रसिध्द कलाकारांच्या संगीतमय सुरातून संगीतप्रेमी आंबेडकरांना मानवंदना देण्यात येणार आहे.

भीमांजली: 6 डिसेंबरला महामानवाला संगीतातून आंदराजली !भीमांजली !
X

आज मुंबईत राष्ट्रनिमाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती यांची पत्रकार परिषद पार पडली ,परिषदेत बोलताना मुकेश जाधव म्हणाले की ,डॅा बाबासाहेब आंबेडकर हे संगीतप्रेमी होते , म्हणून त्यांना ६६ व्या ,महापरिनिर्वाण दिनानिमित्त संगीतातून आदंराजली वाहण्यात येणार आहे .या कार्यक्रमला सर्व धर्मातील धर्मगुरु उपस्थित राहणार आ़ह़ेत. हा कार्यक्रम येत्या ६ डिंसेबर सकाळी ६ वाजता रविद्र नाटगृह होणार आहे .संगीताच्या माध्यामातून डॅा बाबासाहेब आंबेडकर आंदारजली वाहण्यात येणार आहे ,या कार्यक्रमात प्रसिध्द पंडीत मिंलीद रायकर आणि य़ज्ञेश रायकर ,उस्ताद सबिर खान , अक्षय भजन सोपारी ,पंडीत मुकेश जाधव इत्यादी मान्यवर आपली कला सादर करणार आहेत .

या कार्यक्रम आयोजन राष्ट्रनिमाते डॅा बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती करणार असुन या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उद्योग सचिव डॅा हर्षदीप कांबळे उपस्थित राहणार आहेत. भींमाजली कार्य्रकमाची सुरवात २०१६ साली ६० व्या ,महापरिनिर्वाण दिनापासुन झाली असुन हे ७ वे वर्ष आहे ,महाराष्ट्रातील वरीष्ठ सनदी आधिकारी, आयपीएस अधिकारी, वकील , समाजसेवक ,राजकीय पदधिकारी ,माध्यम समुह ,उद्गोजक , महिला सर्वच लहान थोर घटक या वैशि्ष्टपुर्ण अभिवादनात सहभाग घेणार आहेत.

राष्ट्रनिमाते डॅा बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे डॅा विजय कदम यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे .या कार्यक्रमातुन एक रॅली काढण्यात असल्याचे देखील डॅा विजय कदम यांनी सांगितले .

बाबासाहेब आणि संगीत

बाबासाहेबांना चांगले गायन, वादन यावे असे वाटायचे. सकाळी कार्यालयात जाण्यापूर्वी आंबेडकर वैद्य यांच्याकडून फिडल वाजवायचे धडे घ्यायचे. बाबासाहेबांनी मुंबईत नाना आणि बाळ साठेंकडून व्हायोलिनचे धडे घेतले होते. त्यांना तबलावादनाची आवड होती. आंबेडकरांकडे संगीताच एलपी रॅकॉर्ड संच होता. आता तो नागपूरच्या शांतिवन स्मृती संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.

Updated : 3 Dec 2022 2:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top