Home > News Update > अंध-गतीमंद मुलाच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया केली अन तो बोलायला लागला

अंध-गतीमंद मुलाच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया केली अन तो बोलायला लागला

अंध-गतीमंद मुलाच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया केली अन तो बोलायला लागला
X

डॉ लहाने

या शिबिराची वाट पाहत थांबल्यामुळे बऱ्याच रूग्णांचे मोतिबिंदु पिकले होते. या शिबिरात एक मतिमंद मुलगा पण आला होता तो पाच वर्षापासुण दोन्ही डोळ्यांनी अंध होता. शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याला दृष्टी प्राप्त झाली आणि तो बोलायला लागला. सकाळी आठ वाजल्यापासून रात्री बारापर्यंत शस्त्रक्रिया चालत होत्या पण दुसऱ्या दिवशी दृष्टी प्राप्त झालेल्या रूग्णांच्या चेहऱ्यावरील हसू पाहून शस्त्रक्रिया करण्यास ऊर्जा मिळते, अशा शब्दांत डॉ. लहाने यांनी बारामती येथे पार पडलेल्या नेत्र शिबीराचं वर्णन केलं आहे.

बारामती इथल्या सुनेत्रा पवार यांच्या एन्व्हायर्मेंटल फोरम आणि जेजे रूग्णालयातर्फे दरवर्षी नेत्र शिबिर आयोजित करण्यात येतं. या शिबिराचं हे दहावं वर्ष आहे. या शिबिरात 22 ऑगस्ट रोजी 2500 रुग्णांची तपासणी करण्यात आली व शस्त्रक्रिया करण्यासाठी 518 रुग्णांना भरती करण्यात आले. 23 आणि 24 ऑगस्टला 419 रुग्णावर बिनाटाका नेत्रभिंगारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 99 रुग्ण, त्यांना असलेल्या आजारामुळे परत पाठवण्यात आले. यातील ८० रुग्णांना मधुमेह होता. त्यातील काही रुग्णांना त्यांना मधुमेह असल्याचे माहितीही नव्हते. ज्या रूग्णांच्या शस्त्रक्रिया केल्या, त्यामध्येही 160 रुग्णांना मधुमेह होता. बारामती येथे मधुमेहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचे असल्याचे यावरून लक्षात येते. मधुमेह आहे हे माहीत असणारे रुग्ण पण मधुमेहाची काळजी घेताना दिसत नव्हते. शारीरिक श्रम कमी झाल्यामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले असावे असे वाटते. असं निरिक्षण या शिबिरानंतर लहाने यांनी नोंदवलं आहे.

Updated : 25 Aug 2019 5:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top