Home > News Update > डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून मुंबई महापालिकेचे कौतूक

डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून मुंबई महापालिकेचे कौतूक

कोरोना काळात मुंबई महापालिकेने केलेल्या चांगल्या कामाचे जागतिक स्तरावर चर्चा झाली होती त्यामुळे मुंबई महापालिकेच्या नियोजनाचा दाखला देण्यात येत होता. याच कामावरून डॉ. तात्याराव लहाने यांनी मुंबई महापालिकेचे कौतूक केले.

डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून मुंबई महापालिकेचे कौतूक
X

कोविड काळात संपूर्ण जगभर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबईमध्ये क्षेत्रफळच्या दृष्टीने लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात असून देखील, मुंबई महानगरपालिकेने नियोजनबद्ध काम केले होते. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी लिखित ‘लढा मुंबईचा कोविडशी’ या पुस्तकाच्या प्रकाशनचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रकाशन सोहळ्यात अनेक डॉक्टर, सफाई कामगार, आशा सेविका, वार्ड बॉय, तसेच कोरोनाकाळात फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम केलेल्या सर्व महापालिका कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले होते. यावेळी डॉ. तात्याराव लहाने यांनी महापालिकेच्या कामाचे कौतूक केले.

मुंबई महापालिकेने कोरोना काळात जे काम केले. त्याचा अभिमान मलाच नसून संपूर्ण देशाला आहे. तसेच सुरेश काकाणी यांनी पुस्तकाचे प्रकाशन हे प्रत्यक्षात कोरोना लढ्यात सहभागी असणार्‍या नर्स, आशा सेविका, वॉर्ड बॉय, आणि डॉक्टर यांच्या हस्ते केलं, ही गोष्ट फार अभिमानास्पद आहे. यामुळे समाजात या कर्मच्याऱ्यांविषयी वेगळा आदर निर्माण होईल, असे देखील डॉ. लहाने म्हणाले.

डॉ.लहाने यांनी जे.जे.हॉस्पिटलचे डीन म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी राज्यातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारण्यात महत्त्वाचे योगदान आहे. आपल्या प्रशासकीय भूमिकांव्यतिरिक्त डॉ. लहाने नेत्र काळजीमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे आणि विशेषत: मोतीबिंदूच्या अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत. वंचित समुदायांना परवडणारी सेवा दिली. तसेच सुलभ नेत्रसेवा प्रदान करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी त्यांना ओळखले जात आहे.

मुंबई महापालिकेचे माजी अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी लिहीलेल्या 'लढा मुंबईचा कोविडशी' या पुस्तकात नेमकं काय आहे?

• 'मुंबई फाइट्स बॅक' या सुरेश काकाणी लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचे शब्दांकन ज्येष्ठ पत्रकार सुमित्रा डेबरॉय यांनी केले होते‌‌. या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन अमिताभ बच्चन यांच्या हस्ते गेल्या वर्षी झाले होते. तर या पुस्तकाचा मराठी अनुवाद वैशाली रोडे यांनी केला असून मराठी पुस्तकामध्ये कालसुसंगत काही अतिरिक्त मजकूर देखील घेण्यात आला आहे.

• कोविड या साथरोगाचा मुकाबला करण्यासाठी 'टीम बिल्डिंग' वर लक्ष केंद्रित करून त्याचवेळी वैद्यकीय दृष्ट्या आवश्यक पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन आणि विविध स्तरीय उपाययोजनांची परिपूर्ण अंमलबजावणी कशी करण्यात आली, याचा सुव्यवस्थित उहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे.

• कोविड विरोधातील लढा लढत असताना आलेले अडथळे आणि त्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी राबविलेल्या बाबी यांचीही सांगोपांग माहिती या पुस्तकात आहे.

• भविष्यात साथ रोग विषयक व्यवस्थापन करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी; याचीही रूपरेषा या पुस्तकात आहे.

• अत्यंत ओघवत्या व संवादात्मक शैलीत कोविड विरोधातील विविध बाबींची आणि घटनांची माहिती देणा-या या संग्राह्य पुस्तकाचे प्रकाशन 'ग्रंथाली' या सुप्रसिद्ध प्रकाशन संस्थेद्वारे करण्यात आले आहे.

'लढा मुंबईचा कोविडशी' हे पुस्तक 'ॲमेझॉन' या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

Updated : 21 May 2023 1:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top