Top
Home > News Update > मृतदेहाशेजारी रुग्णावर उपचार, सायन हॉस्पिटलच्या डीनची उचलबांगडी

मृतदेहाशेजारी रुग्णावर उपचार, सायन हॉस्पिटलच्या डीनची उचलबांगडी

मृतदेहाशेजारी रुग्णावर उपचार, सायन हॉस्पिटलच्या डीनची उचलबांगडी
X

सोशल मीडियावर कोव्हीड 19 च्या मृत रुग्णांच्या जवळच रुग्णांवर उपचार करत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर विरोधी पक्षाने सरकार वर टीकेची झोड उठवली होती.

या संदर्भात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकनी यांनी सायन हॉस्पिटल च्या प्रशासनाशी बातचित केली असता, सायन हॉस्पिटलच्या शव गृहाची क्षमता संपल्यामुळं हे मृतदेह ठेवण्यात आल्याचं डॉ. प्रमोद इंगळे यांनी सांगितलं होतं. मात्र, राज्य सरकार ने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

या संदर्भात बोलताना उद्धव ठाकरे यांनी गलथान कारभार, दफ्तर दिरंगाई ला क्षमा केली जाणार नाही. असा सज्जड दम भरला होता. त्यानंतर आज सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. डॉ. रमेश भारमल हे सायन रुग्णालयातील नवे अधिष्ठाता असणार आहे.

Updated : 9 May 2020 7:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top