Home > News Update > सरकारशी बातचीत करणा-या ५ सदस्यीय समितीत महाराष्ट्रातून अशोक ढवळे, शेतक-यांना न्याय मिळणार का?

सरकारशी बातचीत करणा-या ५ सदस्यीय समितीत महाराष्ट्रातून अशोक ढवळे, शेतक-यांना न्याय मिळणार का?

शेतकरी आंदोलनः सरकारशी बातचीत करणा-या ५ सदस्यीय समितीत महाराष्ट्रातून अशोक ढवळे, महाराष्ट्रातील शेतक-यांना न्याय मिळणार का?

सरकारशी बातचीत करणा-या ५ सदस्यीय समितीत महाराष्ट्रातून अशोक ढवळे, शेतक-यांना न्याय मिळणार का?
X

आज संयुक्त किसान मोर्चाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतक-यांच्या समस्यासंदर्भात सरकारशी बातचीत करण्यासाठी एका ५ सदस्यीय समितीची घोषणा केली आहे.

या समितीत

बलवीर सिंह राजेवालः पंजाब

गुरूनाम सिंह चढूनीः हरियाणा

शिवकुमार कक्काः मध्यप्रदेश

युधवर सिंहः उत्तर प्रदेश

अशोक ढवळेः महाराष्ट्र

यांचा समावेश आहे. ही समिती संयुक्त किसान मोर्चाच्या मागण्या सरकारकडे मांडणार आहे. या समितीत ५ राज्यांचे सदस्य असून महाराष्ट्रातून अशोक ढवळे यांची या समितीत निवड करण्यात आली आहे. या समितीतील सदस्य अशोक ढवळे यांच्याशी आम्ही बातचीत केली. यावेळी त्यांनी ही समिती संयुक्त किसान मोर्चाच्या मागण्या सरकारकडे मांडणार असल्याची माहिती दिली आहे.

कृषीविषयक कायदे मागे घेतल्यानंतर त्यांच्या उर्वरित मागण्यांवरही सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी ढवळे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी एमएसपीबाबत हमीभाव कायदा करणे आणि आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणे महत्त्वाचे आहे. असं मत व्यक्त केलं आहे.

Updated : 5 Dec 2021 5:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top