Home > News Update > तहसिलदाराला मारहाण करणारे अनिल बोंडे जेव्हा पोलिसांना 'सरकारी कुत्रे' म्हणतात...

तहसिलदाराला मारहाण करणारे अनिल बोंडे जेव्हा पोलिसांना 'सरकारी कुत्रे' म्हणतात...

तहसिलदाराला मारहाण करणारे अनिल बोंडे जेव्हा पोलिसांना सरकारी कुत्रे म्हणतात...
X

मुंबई: एमपीसी परीक्षा रद्द केल्याच्या विरोधात आंदोलन करताना अमरावतीत भाजपचे नेते आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी पोलिसांशी हुज्जत घालत पोलिसांना चक्क 'सरकारी कुत्रे' म्हटलं आहे. त्यांच्या ह्या विधानाने आता सर्वच स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे.

मपीएससीच्या परीक्षा रद्द केल्याच्या मुद्द्यावरून काल राज्यभरात ठीक-ठिकाणी आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे अमरावतीत सुद्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं होतं. तर या आंदोलनात भाजप नेते अनिल बोंडे यांनी सुद्धा सहभाग घेतला. पण याचवेळी पोलीस आणि बोंडे यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्याच वेळी बोंडे यांनी पोलिसांना सरकारचे कुत्रे असं हिणवलं, त्यानंतर पोलिसांनी तुम्ही पण तर कुत्रेच असल्याचं प्रत्युत्तर दिलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांशी असं वर्तन करणाऱ्या अनिल बोंडे यांचा निषेध केला जात आहे.

'यापूर्वी नायब तहसीलदाराला केली होती मारहाण' अनिल बोंडे यांचा हे पहिलाच पराक्रम नाही, कारण यापूर्वी सुद्धा त्यांनी 2016 मध्ये एक तहसीलदाराला मारहाण केली होती. अमरावतीचे तत्कालीन नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांच्याशी संजय गांधी निराधार योजनेत त्रुटी असल्याचं कारण देत बोंडे यांनी वाद घातला होता. तर या वादात संतापलेल्या बोंडेनी थेट या नायब तहसिलदारांना मारहाण केली होती. या मारहाणीची ही मोबाईल क्लीप सुद्धा व्हायरल झाली होती.

Updated : 12 March 2021 9:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top