Home > News Update > कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे ही आनंदाची बाब- डॉ अजित नवले

कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे ही आनंदाची बाब- डॉ अजित नवले

कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे ही आनंदाची बाब- डॉ अजित नवले
X

अहमदनगर // गेल्या वर्षभरापासून शेतकरी केंद्र सरकारने केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यासाठी आंदोलन करत होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे यावरून किसान महासभेचे नेते डॉ. अजित नवले प्रतिक्रिया देताना म्हटले की, खरच पुन्हा एकदा सिद्ध झाले की विजय नेहमी सत्याचा आणि एकजुटीचा होतो. परंतु, आता प्रश्न असा उपस्थित होतो की वर्षभरापासून सरकारची प्रतिमा या कृषी कायद्यांमुळे आणि शेतकरी आंदोलनामुळे,असंतोषामुळे मलिन झाली आहे. म्हणून तर हा घाट नाही ? मग आधीच का असे कायदे पारित करण्यात आले. की शेतकऱ्यांची आंदोलन संपवावे, म्हणून केलेली ही जुमलेबाजी तर नसेल ना? असा सवाल नवले यांनी उपस्थित केला आहे.

फक्त शेतकऱ्यांच्या हिताचे कसे केंद्र सरकार आहे हे मिरवण्यासाठी हे कायदे पारित केले परंतु याचा फायदा शेतकऱ्यांना न होता फार्म प्रोड्युसर कंपन्यांना जास्त होणार होता हे माहिती असून देखील हे कृषी कायदे केले होते का ? परंतु त्याचा फायदा होताना दिसत नाही शेतकरी केंद्र सरकारवर नाराज आहे आणि येणार्‍या निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी केंद्र सरकारला परवडणार नाही.स्वतःची प्रतिमा सावरायची म्हणून येणाऱ्या अधिवेशनात हे कायदे मागे घेऊ अशी घोषणा मोदींनी केली आहे अशी प्रतिक्रिया डॉ. नवले यांनी दिली.

Updated : 19 Nov 2021 5:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top