Home > News Update > फडणवीसांची ही दुतोंडी भाषा योग्य नाही - नवाब मलिक

फडणवीसांची ही दुतोंडी भाषा योग्य नाही - नवाब मलिक

फडणवीसांची ही दुतोंडी भाषा योग्य नाही - नवाब मलिक
X

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर राष्ट्रवादीकडून पलटवार करत फडणवीस यांच्या तोंडी दुतोंडी भाषा योग्य नाही, अशा शब्दात प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

तुम्ही नवीमुंबईतील भतीजाच्या एका ३०० कोटीच्या जमीन व्यवहारप्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत केली त्यावेळी ती चांगली होती आणि आता आमच्या सरकारने गठीत केलेल्या

निवृत्त न्यायाधीशांच्या एक सदस्यीय समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे योग्य नाही. फडणवीस ही दुतोंडी भाषा योग्य नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीसांच्या टिकेला उत्तर दिले आहे.

परमबीरसिंग यांनी केलेल्या आरोपावर सरकारने एक सदस्यीय निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत केली असून तिला अधिकार नसल्याची टिका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्या टिकेचा समाचार नवाब मलिक यांनी घेतला आहे.

एक सदस्यीय निवृत्त न्यायाधीशांची ही समिती सहा महिन्यात आरोपांची चौकशी करुन अहवाल सरकारला सादर करेल असे सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेला नवाब मलिक यांनी नवीमुंबईतील भतीजा जमीन व्यवहारात अशीच एक निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीने चौकशी केली होती. स्वतः समिती गठीत केली त्यावेळी ती ठिक आणि आमच्या सरकारने गठीत केली तर ती अधिकार नसलेली ही दुतोंडी भाषा योग्य नाही. चौकशी झाल्यावर काय सत्य आहे ते बाहेर येईलच याची आठवण नवाब मलिक यांनी करुन दिली.

Updated : 31 March 2021 3:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top