Home > News Update > वाढत्या बलात्काराच्या गुन्ह्यांमुळे भारतात सावधगिरी बाळगा, अमेरिकेचा आपल्या नागरिकांना सल्ला

वाढत्या बलात्काराच्या गुन्ह्यांमुळे भारतात सावधगिरी बाळगा, अमेरिकेचा आपल्या नागरिकांना सल्ला

देशात वाढत असलेल्या बलात्काराच्या घटनांमुळे बायडन प्रशासनाने अमेरीकेच्या नागरीकांनी भारतात प्रवास करताना पुनर्विचार करावा, अशा सूचना दिल्या आहेत. तर हा मोदी सरकारला मोठा धक्का मानला जात आहे.

वाढत्या बलात्काराच्या गुन्ह्यांमुळे भारतात सावधगिरी बाळगा, अमेरिकेचा आपल्या नागरिकांना सल्ला
X

देशात बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे बलात्कार हा भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या गुन्ह्यांपैकी एक आहे, असे सांगत अमेरीकन नागरीकांनी भारतात प्रवास करण्यावर पुनर्विचार करावा, अशा सूचना अमेरीकन प्रशासनाने दिल्या आहेत.

भारतातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभुमीवर अमेरीकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने तिसऱ्या स्तराची प्रवास आणि आरोग्य सूचना जारी केली होती. त्यामध्ये अमेरीकन नागरीकांनी भारतात प्रवास करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा, असा सल्ला दिला होता. त्यासोबतच FDA ने मान्यता दिलेल्या कोरोना लसीचे डोस पुर्ण घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली तरी लक्षणे गंभीर दिसणार नाहीत. तसेच कोरोनाचा धोकाही कमी होईल. त्याचबरोबर लसीकरण पुर्ण न केलेल्या नागरीकांनी आंतरराष्ट्रीय प्रवास करताना सीडीसीच्या शिफारसींचा विचार करावा, अशा सूचना नागरीकांना दिल्या होत्या. त्यानंतर बायडन प्रशासनाने नागरीकांसाठी आणखी एक नोटीस जारी केली.

अमेरीकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने नोटीस जारी केल्यानंतर काही वेळानेच अमेरीकन नागरीकांनी भारतात प्रवास करताना विचार करावा, अशा सूचना दिल्या आहेत. हा भारताला आणि मोदी सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. तर या नोटीसमध्ये देशातील वाढत्या बलात्काराच्या गुन्ह्यांविषयी चिंता व्यक्त केली आहे.

एका रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार भारतात बलात्कार हा सर्वात वेगाने वाढणाऱ्या गुन्ह्यांपैकी एक होत आहे, असे म्हटले. त्याचबरोबरच जम्मू काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादामुळे भारतात प्रवास करण्यासाठी पुनर्विचार करण्याचा सल्ला अमेरीकेने नागरीकांना दिला आहे.

त्याचबरोबर अमेरीकन नागरीकांनी दहशतवादी आणी नागरी अशांतता लक्षात घेता जम्मू आणि काश्मीर राज्यात पूर्व लडाख आणि लेह वगळता प्रवास करू नये अशा सूचना दिल्या आहेत. तसेच सशस्र संघर्ष होण्याची शक्यता असल्याने पाकिस्तान सीमेच्या दहा किलोमीटर आत न जाण्याच्या सूचना अमेरीकेने नागरीकांना दिल्या आहेत. तर मोदी सरकारच्या धोरणांवर आणि कायदा सुव्यवस्थेवर हे मोठे प्रश्न चिन्ह आहे, असे मानले जाते.

Updated : 26 Jan 2022 6:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top