Home > News Update > माझ्यामागे ईडी लागणार नाही कारण मी भाजपचा खासदार: खासदार संजय काका पाटील

माझ्यामागे ईडी लागणार नाही कारण मी भाजपचा खासदार: खासदार संजय काका पाटील

माझ्यामागे ईडी लागणार नाही कारण मी भाजपचा खासदार: खासदार संजय काका पाटील
X

माझ्यामागे ईडी लागणार नाही. कारण मी भाजपचा खासदार आहे. आणि त्या पेक्षा आमची कर्ज पाहिली की ED म्हणेल ही माणसं आहेत की काय? अशी मिश्किल टिपणी भाजप खासदार संजय काका पाटील यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील विटा येथे एका कार्यक्रमात भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी ई डी बाबत हे भाष्य केलं आहे.

ते म्हणाले

माझ्यामागे ईडी लागणार नाही. कारण मी भाजपचा खासदार आहे. स्थानिक नेत्यांनी कर्ज आणि संपत्ती वर भाष्य केलं होते. त्यावर बोलताना संजय काका पाटील म्हणाले

'मी भाजपचा खासदार आहे. त्यामुळे माझ्या मागे ED लागणार नाही. आमची कर्ज पहिली की ED म्हणेल ही माणसं आहेत का काय? खासदार संजय काका पाटलांनी इ डी बाबत बोलताना माजीमंत्री हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्याची आठवण देखील करुन दिली.

काय म्हटलं होतं हर्षवर्धन पाटील यांनी?

आम्हालाही भाजपमध्ये जावं लागलं. तो निर्णय मी का घेतला तेवढं मला विचारू नका. ते काँग्रेसच्या नेत्यांना विचारा, असं ते म्हणाले. 'पण आता भाजपमध्ये मी निवांत आहे. शांत झोप लागते. चौकशी नाही, फिवकशी नाही, काही नाही,'

असं वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केलं होतं.

सध्या महाराष्ट्रात भाजप विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांची ED मार्फत चौकशी सुरु आहे. मात्र, भाजपच्या एकही नेत्याची ED मार्फत चौकशी केली जात नाही. त्यामुळं भाजपशासित केंद्रसरकार विरोधी पक्षांना नामोहरम करण्यासाठी ED चा वापर करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातो.

Updated : 24 Oct 2021 8:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top