Top
Home > News Update > शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात

शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात

शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात
X

राज्यातील महीला महीला मुख्यमंत्र्यांची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर उलट सुलट प्रतिक्रीया येत असून आता आशिष शेलारांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरवू नये अशी टीका आज परिवहनमंत्री श्री.अनिल परब यांनी केली.

परब म्हणाले की, "भाजपला सत्तेची स्वप्न पडत आहेत आणि त्याच स्वप्नात त्यांनी भाजपच्या महिला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवावा." काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी असे मत व्यक्त केले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज अनिल परब यांनी शेलारांना टोला लगावला.

राज्यपालनियुक्त जागांबाबत माहिती देताना श्री. अनिल परब म्हणाले की, "मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना राज्यपालनियुक्त जागांबाबत १५ दिवसांत निर्णय घ्यावा अशी विनंती केली होती. परंतु याबाबत राज्यपालांनी अजून कोणताही निर्णय घेतला नसून याबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील."


Updated : 2020-11-21T21:42:45+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top