Home > News Update > 'पुन्हा सगळं बंद करण्याची वेळ आणू नका'- अजित पवार

'पुन्हा सगळं बंद करण्याची वेळ आणू नका'- अजित पवार

पुन्हा सगळं बंद करण्याची वेळ आणू नका- अजित पवार
X

पुणे : राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने सरकारकडून नागरिकांना खबरदारी घेण्यास सांगण्यात येत आहे. केरळनंतर महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा सगळं बंद करण्याची वेळ आणू नका, असं दरडावून सांगितलं. ते पुण्यात बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'काही लोक रस्त्यावर येऊन राजकारण करत आहेत. नियम पाळले पाहिजेत, अन्यथा ये रे माझ्या मागल्या होईल.' असं पवार म्हणाले.

सोबतच राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. काही लोक दिवाळीनंतर शाळा सुरु करा असं म्हणत आहेत तर काही लोक म्हणत आहेत की ज्याठिकाणी शून्य टक्के रुग्ण आहे, तिथे शाळा सुरु करा. मात्र , याबाबत मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतील, असंही अजित पवारांनी सांगतिलं. ग्रामीण भागात लोक कोरोनायचे नियम पाळत नाही असं म्हणत पुन्हा सर्व बंद पाडण्याची निर्णय घेण्याची वेळ आणू नका असंही ते म्हणाले.

काही लोक मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत. मात्र केंद्र सरकारनेही खबरदारी घेण्याचे सांगितलं आहे, त्यामुळे मंदिरावरून राजकारण कशासाठी असा सवाल अजित पवारांनी केला. दरम्यान राज्य सहकारी बँकेवर ED ची छापेमारी अशी बातमी मीडियात सुरू आहे. मात्र अशी कुठलीही घटना घडली नाही, असं सांगताना ही धादांत खोटी बातमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मीडियाने विश्वासार्ह बातम्या द्याव्यात, लोकांचा विश्वास उडत चालला आहे, असं अजित पवार म्हणाले.

राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत राजू शेट्टी यांच्या नावाला आक्षेप घेतल्याच्या बातम्या बातम्या कुठून येतात कळत नाही, त्यामुळे बातम्या देताना काळजीपूर्वक द्या, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं.

Updated : 3 Sep 2021 5:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top