Home > News Update > ट्रम्प यांना 'बाय', व्हाइट हाऊसला बायडेन यांची प्रतीक्षा

ट्रम्प यांना 'बाय', व्हाइट हाऊसला बायडेन यांची प्रतीक्षा

ट्रम्प यांना बाय, व्हाइट हाऊसला बायडेन यांची प्रतीक्षा
X

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी अखेर जो बायडेन यांचा विजय झालेला आहे. बायडेन यांना 284 तर डोनाल्ड ट्रम्प यांना 214 इलेक्टोपल मतं पडली आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून ही मतमोजणी सुरू होती. मतमोजणी सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र या मतमोजणीला आक्षेप घेत कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने त्यांची मागणी फेटाळून लावल्यामुळे अखेर त्यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

अमेरिकेच्या जनतेने मला राष्ट्राध्यक्ष होण्याचा बहुमान दिला आहे अशी पहिली प्रतिक्रिया जो बाई डे यांनी या विजयानंतर दिलेली आहे यांच्यासह पक्षाच्या कमला हॅरीस या अमेरिकेच्या उप राष्ट्राध्यक्षपगी निवडून आलेल्या आहेत. भारतीय वंशाच्या असलेल्या कमला हॅरीस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष ठरलेल्या आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांना ज्यांनी मतदान केले आहे त्यांची निराशा झाली असणा, पण आता निकाल लागलेला आहे. त्यामुळे आपण सर्वजण एकत्र येऊन अमेरिकेसाठी काम करूया असे आवाहन त्यांनी या निकालानंतर केलेल्या पहिल्या भाषणात केलेले आहे.

Updated : 8 Nov 2020 4:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top