शिवसेनला सत्ता पाहिजे की सावरकर? शहानवाज हुसेन
X
देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यात आला आहे. हा कायदा कोणाचेही नागरिक्तव घेणारे नाही, तर हा कायदा नागरिक्तव देणार कायदा आहे. आहे. स्वतंत्र्यानंतर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानात जे अल्पसंख्यांक लोक राहत होते, ते धर्म वाचवण्यासाठी भारतात आले आणि आता त्यांना नागरिकता देण्यात आली आहे. असं स्पष्टीकरण भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी दिले आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे कांग्रेस बेचैन झाली आहे. काँग्रेसने ईशान्य भारतात असलेल्या राज्यांना भडकवण्याचं काम केलं असून, काँग्रेस संपूर्ण देशाच्या मुसलमानांना घाबरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच दिल्लीत काँग्रेसने केलेल्या आंदोलनात राहुल गांधीनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना देश माफ करणार नाही. राहुल गांधी याना स्वतःचं आडनाव नाही, त्यांनी उधारीच आडनाव घेतलं आहे असा टोला ही त्यांनी लगावला.
तर ज्या काँग्रेसने वीर सावरकरांचा अपमान केला त्या काँग्रेस सोबत शिवसेना सत्तेत कशी राहू शकते असा सवालही या पत्रकार परिषदेतून विचारला. फक्त ट्विट करून शिवसेनला गप्प राहू शकत नाही. त्यांनी सांगितलं पाहिजे की त्यांना सत्ता पाहीजे की सावरकर. उद्धव ठाकरे हे कोणाच्या नियंत्रणात आहे याचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. तसेच शिवसेनला सरकार पाहिजे , की सावरकर? असा सवाल ही शाहनवाज हुसैन यांनी उपस्थिती केला.