Home > News Update > या सरकारला राजु शेट्टीसाहेब व त्यांच्यासोबत चालत येत असणाऱ्या शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे का?

या सरकारला राजु शेट्टीसाहेब व त्यांच्यासोबत चालत येत असणाऱ्या शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे का?

या सरकारला राजु शेट्टीसाहेब व त्यांच्यासोबत चालत येत असणाऱ्या शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे का?

या सरकारला राजु शेट्टीसाहेब व त्यांच्यासोबत चालत येत असणाऱ्या शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे का?
X

गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर सांगली तसेच सबंध राज्यातील पुरग्रस्त शेतकरी बांधव राजु शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात पंचगंगा पायी पदयात्रा व परिक्रमेच्या माध्यमातुन चालत आहेत.. आज राजु शेट्टी साहेब व त्यांच्यासोबत हजारो पूरग्रस्त शेतकरी नृसिंहवाडीकडे नदीमध्ये जलसमाधी घेण्यासाठी कुच करत आहेत.. गेले चार दिवस झाले या यात्रेला उदंड प्रतिसाद मिळतो आहे.. गावोगावी मायमाऊल्या माताभगिनी राजु शेट्टी साहेबांचं औक्षण करत आहेत.. पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मिळालेली मदत ही अत्यंत तोकड्या स्वरूपाची आहे.. यामुळे शेतकर्यांचे नुकसान भरून निघणार नाही यामुळेच पूरग्रस्त बांधवांचा सरकारवर प्रचंड रोष आहे.. या रोषालाच वाचा फोडण्याचे काम राजु शेट्टी यांनी केले आहे.. मात्र आज शेवटचा दिवस असतानाही हे सरकार राजु शेट्टी व सोबतच्या हजारोंच्या शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.. शेतकरी जलसमाधी घेण्याच्या निर्णयापर्यंत गेले असताना सरकार पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर कानाडोळा करत आहे असा थेट आरोप रणजित बागल यांनी सरकारवर केला आहे..

"आता सरकारने शेतकऱ्यांच्या रोषाचा कडेलोट होण्याआधी आज तात्काळ तातडीची मंत्रीमंडळ बैठक बोलावून, पूरग्रस्त शेतकऱ्यांना राजु शेट्टी साहेबांच्या मागणीनुसार सन्मानजनक मोबदला देवुन, हा पेटलेला वणवा विझवावा" असे आवाहन बागल यांनी राज्यसरकारला केले आहे..

आदरणीय राजु शेट्टी साहेब व चालणाऱ्या शेतकर्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही सरकारच्या एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही.. आणि आज निर्णय न झाल्यास आज पेटलेल्या शेतकऱ्यांच्या या वणव्यात सरकार व त्यांचा अहंकार दोन्ही भस्मसात होतील हा आमचा इशारा आहे.. असा इशारा स्वाभिमानी युवासंघटनेचे राज्य प्रवक्ते रंजीत बागल यांनी दिला आहे.

Updated : 5 Sep 2021 10:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top