#Doctorsday : सर्व कोवीड योद्ध्यांना केंद्राचे मोफत विमा कवच, पंतप्रधान मोदींची घोषणा
X
जागतिक डॉक्टर दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. देशातील सर्व कोवीड योद्ध्यांना आता मोफत विमा कवच पुरवले जाणार आहे. जागतिक डॉक्टर दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रातील लोकांशी मोदींनी संवाद साधला. यावेळी कोरोना काळात रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत पंतप्रधान मोदींनी भाष्य केली. आरोग्य क्षेत्रातील सर्वांची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे, आणि त्यासाठी सरकार बांधील आहे, असे मोदींनी सांगितले.
कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरांना यावेळी त्यांनी आदरांजली वाहिली. कोरोनाच्या काळात डॉक्टरांनी लाखो लोकांचे प्राण वाचवले. एवढेच नाही तर अनेकांनी रुग्णसेवा करताना आपले प्राणही गमावले. अशा सर्व डॉक्टरांना आदरांजली वाहत पंतप्रधान मोदींनी आता कोवीड योद्ध्यांसाठी मोफत विमा कवच देण्याची घोषणा केली आहे. देशात 2014 मध्ये केवळ 6 ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस होते, पण गेल्या सात वर्षात 15 नवीन AIIMS च्या कामांना सुरूवात झाल्याचे त्यांनी सांगितले.