Home > Election 2020 > निवडणूक निकालांचा अंदाज वर्तवणारे कार्यक्रम दाखवू नका – निवडणूक आयोग

निवडणूक निकालांचा अंदाज वर्तवणारे कार्यक्रम दाखवू नका – निवडणूक आयोग

निवडणूक निकालांचा अंदाज वर्तवणारे कार्यक्रम दाखवू नका – निवडणूक आयोग
X

सध्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून निवडणूक पूर्व सर्वेक्षण, निकालांचा अंदाज वर्तवणारे कार्यक्रम सुरू आहेत. त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगानं निर्बंध घातलेले आहेत.

निवडणुकांसंदर्भात कुठल्याही प्रकारचे अंदाज, भाकिते प्रसारमाध्यमांकडून वर्तवली जात आहेत. यामध्ये ज्योतिष, भविष्यासंदर्भात अंदाज वर्तवणारे पत्ते, राजकीय विश्लेषक किंवा कुठल्याही व्यक्ती यांनी निवडणुकांच्या कालावधीत अंदाज किंवा भाकितं वर्तवणं हा कलम १२६ अ नुसार गुन्हा असल्याचं आयोगाचं म्हणणं आहे. अशा प्रकारांमुळं निवडणुकांवर प्रभाव पडू शकतो, असं आयोगाचं म्हणणं आहे.

सर्व प्रसारमाध्यमांनी निकालांवर परिणाम होईल, असा कुठलाही मजकूर प्रसिद्ध करू नये, असंही आयोगानं स्पष्ट केलंय. हे निर्बंध ११ एप्रिल सकाळी सातवाजेपासून ते १९ एप्रिल २०१९ सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत लागू आहेत. कारण याच कालावधीमध्ये लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाबरोबरच आंध्रप्रदेश, अरूणाचल प्रदेश, ओदिशा आणि सिक्किम इथल्या विधानसभेच्याही निवडणुका होत आहेत. या शिवाय काही राज्यांमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकाही होत आहेत, असं आयोगानं स्पष्ट केलंय.

Updated : 8 April 2019 3:23 PM GMT
Next Story
Share it
Top