कुटुंबापासुन दूर परप्रांतीय विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात दिवाळी साजरी

112

शिक्षणासाठी बाहेरगावी राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जोशी-बेङेकर महाविद्यालय (Joshi Bedekar College) येथे अनोखा उपक्रम राबवत दिवाळी साजरी करण्यात आली. महाविदयालयातील सांस्कृतिक सभागृहात रांगोळी, फुलांच्या माळा अशी आकर्षक सजावट करण्यात आली. महाविद्यालयात शिकणारे बाहेरगावचे विद्यार्थी यांचं औक्षण करण्यात आलं. सप्तसुरात ही दिवाळी साजरी करण्यात आली. यात दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करत या कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी मनसोक्त फराळाचा ही आंनद घेतला.

परप्रांतीय विद्यार्थ्यांना कुंटुंबियाची उणिव भासू नये, सणाबददल माहिती मिळावी, शिक्षणासोबतच संस्कृती संवर्धन व्हावं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. मुळ काश्मिरचा असणारा गगन यांने काश्मिरला दिवाळी कशी साजरी होते याबददल माहिती दिली. या स्तुत्य उपक्रमाचे नियोजन स्वप्निल मायेकर आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी केले होते. आंनदाच्या वातावरणात अनोख्या पध्दतीने दिवाळी साजरी करण्यात आली.