Home > News Update > जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी चौकशी समिती अहमदनगरमध्ये दाखल

जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी चौकशी समिती अहमदनगरमध्ये दाखल

जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी चौकशी समिती  अहमदनगरमध्ये दाखल
X

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोविड आयसीयू वॉर्डमध्ये शनिवारी (दि.6नोव्हेंबर) रोजी लागलेल्या भीषण आगीत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही चौकशी समिती आज चौकशीसाठी अहमदनगर शहरात आली होती. या समितीने जिल्हा रुग्णालयात ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या विभागांची पाहणी केली.

त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात या घटनेशी संबंधित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी देखील प्राथमिक अहवाल समितीसमोर सादर केला आहे. दरम्यान ही संपूर्ण चौकशी 8 ते 10 दिवसात पूर्ण होणार असल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले आहे. त्यामुळे या समितीतून काय माहिती समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Updated : 11 Nov 2021 2:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top