Home > News Update > नितेश राणेंच्या अटकेचा मार्ग मोकळा...न्यायालयाने जामीन फेटाळला

नितेश राणेंच्या अटकेचा मार्ग मोकळा...न्यायालयाने जामीन फेटाळला

नितेश राणेंच्या अटकेचा मार्ग मोकळा...न्यायालयाने जामीन फेटाळला
X

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीच्या वादातून शिवसेना नेते संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे संकटात आले आहेत. दोन दिवसांपासून नितेश राणे हे अज्ञातवासात आहेत. तर पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. मात्र या अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी नितेश राणे यांनी वकिलामार्फत जिल्हा सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने निर्णय देत नितेश राणे यांचा जामीन फेटाळला.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा आऱोप शिवसेना नेते संतोष परब यांनी केला. त्यानंतर नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नितेश राणे सभागृहात उपस्थित न राहता अज्ञात स्थळी निघून गेले. त्यानंतर नितेश राणे यांनी एक व्हिडीओ शेअर करत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील पराभव समोर दिसू लागल्याने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करत असल्याचे म्हटले. तर महाविकास आघाडी सुडाच्या भावनेने पोलिस यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर पोलिसांनी राणे यांच्या घरी जाऊन नितेश राणे यांचा शोध घेतला मात्र नितेश राणे अज्ञातस्थळी रवाना झाल्याने पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

त्यानंतर नितेश राणए आणि संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर या प्रकरणाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्र नितेश राणे आणि संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला असल्याची माहिती आमदार नितेश राणए यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली. तर आपण राणेंना जामीन मिळवून देण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

मात्र यावर प्रतिक्रीया देतांना भाजपा नेते आमदार प्रसाद लाड म्हणाले की, आम्ही वारंवार सांगत होतो की, महाविकास आघाडी राणे कुटूंबियांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तेआज तेच झाले. पण या प्रकरणात आम्ही उच्च न्यायालयात धाव घेणार आहोत, अशी माहितीही प्रसाद लाड यांनी दिली.

Updated : 30 Dec 2021 1:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top