Home > News Update > डिझेलच्या किंमतीत काहीशी घसरण, पेट्रोल मात्र जैसे थे

डिझेलच्या किंमतीत काहीशी घसरण, पेट्रोल मात्र जैसे थे

31 दिवस सलग इंधन दर स्थिर राहिल्यानंतर डिझेलच्या भावात काहीशी घसरण सुरु झालेली पाहायला मिळली.गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी डिझेलच्या भावात घसरण झाली.

डिझेलच्या किंमतीत काहीशी घसरण, पेट्रोल मात्र जैसे थे
X

मुंबई : 31 दिवस सलग इंधन दर स्थिर राहिल्यानंतर डिझेलच्या भावात काहीशी घसरण सुरु झालेली पाहायला मिळली. गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी डिझेलच्या भावात घसरण झाली. नव्या दरपत्रकानुसार डिझेल 20 पैशांनी स्वस्त झाले आहे. डिझेलच्या भावात घसरण पाहायला मिळत असताना पेट्रोलचे दर अद्याप जैसे थेच आहे. डिझेलच्या दरात यापुढे घसरण सुरु राहिली तर येत्या काळात पेट्रोलचे दर देखील खाली येतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

नव्या दरपत्रकानुसार मुंबईत डिझेलचे दर 20 पैशांनी स्वस्त झाले असून आता डिझेल प्रतीलिटर 97.04 रुपये दराने मिळत आहे.तर मुंबईत पेट्रोलसाठी प्रतिलीटर 107.83 रुपये मोजावे लागत आहे. तर तिकडे दिल्लीत पेट्रोलसाठी प्रतीलीटर 101.84 मोजावे लागत असून एक लीटर डिझेल 89.47 रुपये एवढ्या किंमतीत मिळत आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दररोज सकाळी 6 वाजता बदल होत असतो.त्यानुसार सकाळी सहा वाजता नवे दर लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

Updated : 19 Aug 2021 4:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top