Home > News Update > शिवसेनेसाठी सर्वच केले, पण घरभेद्यांनी संभ्रम निर्माण केला - भास्कर जाधव

शिवसेनेसाठी सर्वच केले, पण घरभेद्यांनी संभ्रम निर्माण केला - भास्कर जाधव

शिवसेनेसाठी सर्वच केले, पण घरभेद्यांनी संभ्रम निर्माण केला - भास्कर जाधव
X

मी कधीही माझी निवडणूक बघत नाही किंवा त्याबाबत कसली काळजीही करत नाही. तर मी माझ्या सहकाऱ्यांची निवडणूक बघण्यासाठी त्याठिकाणी मदत करतो. केवळ जिल्हा परिषद, पंचायत समितीच नव्हे तर ग्रामपंचायतीसाठीही मी पालकमंत्री असतानाही गेलो, निवडणूक कोणती आहेत हे माझ्यासाठी महत्वाचे नाही तर माझा सहकारी होता म्हणून मी गेलो. मी माझ्या सहकाऱ्यांच्या कायम पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो, असे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

मला मंत्रीपद मिळाले नाही पण तरीसुध्दा मी लढतो ते केवळ उध्दव ठाकरे यांच्यासाठीच. यापुढेही मंत्रीपद मिळणार नाही हे मला माहित आहे. उध्दव साहेबांना मी म्हणालो आहे की, तुमच्या मनात माझ्या बद्दल जे काही असेल ते असूद्या, पण मी २०२४ ची विधानसभा निवडणुक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही, असा शब्द देत आहे. असे आश्वासन देताना भास्कर जाधव म्हणाले.

ज्यावेळी पक्षात फुटाफुट झाली तेव्हा गटनेता म्हणून माझाच दावा होता. परंतू त्यावेळी मला गटनेता करण्यात आलं नाही. तेव्हा मी काहीच बोललो नाही. त्यानंतर बैठकीत भाजपला विरोध करणारा मी एकटा होतो. २० तारखेला मतदान झाले. मी २१ तारखेला इथेच होतो. त्यानंतर उध्दव ठाकरेंचा मला फोन आला तेव्हा मी मुंबईला गेलो. उध्दव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली होती. त्या बैठकीत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना सरळ सांगितले की, तुम्ही भाजपासोबत गेले तर मी तुमच्या सोबत नसणार, सर्व गेले तरी चालतील, पण आपण दोघेच राहू, असं आपणास उध्दव ठाकरे यांनी सांगितल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटले.

Updated : 10 March 2024 9:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top