Home > News Update > धारावी पुनर्विकासाला गती मिळणारः हेमंत पाटील

धारावी पुनर्विकासाला गती मिळणारः हेमंत पाटील

महाविकास आघाडीच्या काळात केंद्राने रखडवून ठेवलेले राज्याचे प्रकल्प आता शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यामुळे मार्गी लागल्याचे दिसत आहे

धारावी पुनर्विकासाला गती मिळणारः हेमंत पाटील
X

रेल्वेची सुमारे 45 एकर जागा हस्तांतरित न झाल्याने रखडलेल्या धारावी पुनर्विकासाला आता गती मिळणार आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी दिलेल्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत, महिन्याभरात रेल्वेची जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्याची ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावतीने देण्यात आली आहे. या प्रकरणी पाठपुरावा करणाऱ्या खासदार शेवाळे यांनी ही माहिती दिली आहे.

आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासासाठी रेल्वेची सुमारे 45 एकर जागा राज्य सरकारला हस्तांतरित केली जाणार होती. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने रेल्वेला सुमारे 800 कोटी रुपयांचा निधीही देण्यात आला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही हस्तांतरण प्रक्रिया रखडल्याने धारावी पुर्विकास प्रकल्पाला ब्रेक लागला होता. याविषयी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन यावर त्वरित तोडगा काढण्याची विनंती केली. यावेळी महिन्याभरात रेल्वेची जागा राज्य सरकारला हस्तांतरित केली जाणार असल्याची ग्वाही रेल्वेमंत्र्यांनी दिली.

Updated : 29 July 2022 3:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top