Home > News Update > धनगर आरक्षणासंदर्भात सरकार लॉलीपॉप, चॉकलेट देत आहे ; धनगर समाजाचा अधिवेशनावर धडक मोर्चा

धनगर आरक्षणासंदर्भात सरकार लॉलीपॉप, चॉकलेट देत आहे ; धनगर समाजाचा अधिवेशनावर धडक मोर्चा

धनगर आरक्षणासंदर्भात सरकार लॉलीपॉप, चॉकलेट देत आहे ;  धनगर समाजाचा अधिवेशनावर धडक मोर्चा
X

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. यापार्श्वभूमिवर एस टी आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. एस टी प्रवर्गामधील आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आज नागरपूर अधिवेशनाला धडक देणार आहे. अनेक सरकार येतात जातात परंतू आमच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी केली नसल्याचं आंदोलक म्हणत आहेत.

धनगर आरक्षणासंदर्भात पहीलं सरकार लॉलीपॉप देत होतं आताचं सरकार चॉकलेट देत आहे. हा काय प्रकार आहे? असा सवाल उपस्थित करतं आमदार गोपीचंद पडळकर ही समाजाची तोफ आहे त्यांच्या वर चपला फिरकावल्या जात आहेत. तरीही आम्ही शातं आहोत. आम्ही जर बिघडलो तर तुम्हाला कुठंच महाराष्ट्रात दिसू देणार नाही. धनगर समाजला कधीच कमी समजू नका. धनगड नावाच कुठं किंवा वानर आहे, हे दाखवावं. धनगर समाजाची का दिशाभूल केली जातेय ? असा सवाल या अंदोलकांनी नागपूर येथी एल्गार मोर्चातून उपस्थित केला आहे.

Updated : 11 Dec 2023 5:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top