खासदार संजय काकडे यांना पंकजा मुंडें विरोधातील वक्तव्यामुळे धमकी

भाजपजे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर पार पडलेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी पक्षातील नेत्यांवर आणि विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपल्या भाषणातुन रोष व्यकत केला होता. यावेळी त्यांनी मी आता मुक्त असुन थांबणार नाही. महाराष्ट्रभर फिरुन सामाजिक कार्यात मदत करेन असं म्हटलं होत.

यावर भाजप नेते संजय काकडे यांनी पंकजा मुंडेवर निशाणा साधत “पाच वर्ष तुम्ही सत्तेत होता. तेव्हा तुम्हाला काही काम करता आलं नाही. मग महाराष्ट्रात फिरुन तुम्ही काय दिवे लावणार?” असा सवाल पंकजा मुंडे यांना केला आहे. ज्याला आपला मतदारसंघ सांभाळता येत नाही, त्यांनी मी पक्ष वाढवेल, मी हे करेल मी ते करेल असं बोलू नये असं म्हणत पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे.

संजय काकडे यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावर वंजारी समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला असुन वंजारी समाजातील कार्यकर्त्यांकडुन थेट धमकीवजा संदेश फॅसबुकच्या माध्यामातुन देण्यात आला आहे. संजय काकडे यांना आता घरातुन बाहेर निघुन दाखवा असं आव्हान धनराज गुट्टे यांनी केलं आहे.