Home > News Update > Dhananjay Munde : टायगर अभी जिंदा है... धनंजय मुंडेच्या स्वागतासाठी परळीत ५० फुटी बॅनर्स....

Dhananjay Munde : टायगर अभी जिंदा है... धनंजय मुंडेच्या स्वागतासाठी परळीत ५० फुटी बॅनर्स....

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा परळीमध्ये कार अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले होते. मुंडे हे आता उपचार घेवून पुन्हा परळीत दाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी परळीमध्ये ५० फुट उंचीचे बँनर्स लावण्यात आले आहेत.

Dhananjay Munde : टायगर अभी जिंदा है... धनंजय मुंडेच्या स्वागतासाठी परळीत ५० फुटी बॅनर्स....
X

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे परळीत झालेल्या अपघातानंतर उपचारासाठी मुंबईत दाखल झाले होते. ते उपचार घेतल्यानंतर पहिल्यांदाच परळीत येत आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या समर्थकांनी मुंडे यांचे जोरदार स्वागत करण्याचे ठरवले आहे. आणि त्यासाठी जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे. रविवारी धनंजय मुंडे हे परळीत दाखल होणार आहेत. त्यामुळे परळीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी परळी पूर्णपणे सजवून टाकली आहे. टायगर अभी जिंदा है...या आशयाचे बॅनर्स संपूर्ण परळीमध्ये लावण्यात आले आहेत. हे बनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

धनंजय मुंडे यांचे ज्या मार्गावरुन परळीत आगमन होणार आहे, तेथे मोठमोठ्या कमानी उभारण्यात आल्या आहेत. धनजंय मुंडे आणि अजित पवार यांचे मोठमोठे कटाऊट्स परळीतील रस्त्यावर दिमाखात उभे आहेत. जवळपास ३५ दिवसांनंतर धनंजय मुंडे हे मुंबईत उपचार घेऊन परळीत दाखल होणार आहेत. धनंजय मुंडे यांचा ४ जानेवारीच्या रात्री परळीत भीषण अपघात झाला होता. या घटनेत त्यांच्या कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. तर मुंडे यांच्या डोक्याला आणि छातीला मार लागला होता. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रविवारी जवळपास ३५ दिवसांनंतर ते परळीत दाखल होणार आहेत. एवढ्या मोठ्या अपघातातून ते सुखरुप बचावले, याचा आनंद कार्यकर्ते साजरा करणार आहेत.

परळी शहरातील प्रत्येक प्रवेशद्वाराला कमानीने सजवण्यात आले आहे. रविवारी धनंजय मुंडे बीडमध्ये दाखल झाल्यानंतर ते सर्वप्रथम गहिनीनाथ गडावर जावून वैद्यनाखाचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते आपल्या मूळ गावी परळीत दाखल होणार आहेत. तसेचं पांगरी येथे गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती स्थळाचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर मुंडे यांची परळीत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या रॅलीसाठी केरळ णि तिरुपती बालाजी इथून बँड पथक, तसेच मुंबईतील ढोल पथक मागवण्यात आले आहे. तर खास बीएमडब्ल्यू गाडीतून त्यांची मिरवणूक निघणार आहे. त्याचप्रमाणे परळीच्या सर्व रस्त्या-रस्त्यावर विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे.

Updated : 11 Feb 2023 11:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top